आपण सत्ताधारी आहोत ; आता रडगाणी बंद करा – नितीन गडकरी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या निवडणुकीला आता थोडाच अवकाश उरला असताना राजकारणाला आता ज्वर चढू लागला आहे. महाराष्ट्रातील भाजप खासदाराच्या कार्याच्या आढाव्याची आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या आढाव्याची बैठक काल महाराष्ट्र्र सदन मध्ये आयोजित करण्यात आली होती.  निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांना उशीर झाल्याचे सांगून रडगाणे गाऊ नका असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणले आहे. भाजपच्या खासदारांना गडकरी यांनी चांगलेच फैलावर घेतल्याचे चित्र काल महाराष्ट्र्र सदन मध्ये रंगल्याचे दिसून आले आहे.

मतदार संघात कामे झाली नाहीत हि रडगाणी बंद करा जनतेपुढे सरकारच्या सकारात्मक कामाचा दाखला द्या असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. विरोधी पक्षात आपण असायचो तेव्हा आपण कामे झाली नाहीत म्हणून ओरडत असायचो. आता हि आपण तोच सूर आळवला तर आपण जनतेची दिशाभूल करू म्हणून आपण सत्तेत असल्याचे भान राखा. लोकांच्या समोर सरकारच्या सकारात्मक कामा बद्दल बोलत रहा असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या खासदारांना मार्गदर्शन करताना लोकांशी व्यापक संपर्कावर भर द्यावा असे म्हणले आहे. २५ जानेवारी पर्यत आपण आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मतदारसंघातील समस्यांची आणि प्रश्नांची निकड जाणून घ्यावी आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घ्यावी असे अमित शहा म्हणाले आहेत. तसेच लोकसभेची निवडणूक हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढवल्या जाणार आहेत असे  म्हणायला अमित शहा विसरले नाहीत.

शिवसेना आपल्या सोबत आहे का हे समजले तर कामात स्पष्टता येईल असे एका खासदारांनी म्हणताच अमित शहा यांनी त्यावर उत्तर देताना म्हणले कि , शिवसेनेशी काहीही गमावून युती करण्यासाठी  आपण तयार नाही. परंतु भाजपच्या सोबत शिवसेना यायला तयार नसेल तर त्यांच्या सोबत युती करायला आपणही आग्रह करणार नाही. आपण लोकसभेच्या सर्वच ४८ जागी लढणार आहोत असे समजून कामाला लागा असे अमित शहा म्हणाले आहेत.