कोंढव्यात गोळीबार करणारा अटकेत

पुणे पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या भांडणात रिक्षाचालकावर गोळीबार करून पसार झालेल्याला कोंढवा पोलिसांच्या पथकाने सोमवारी अटक केली.

सलमान उर्फ लड्डू जावेद दलाल (२५, कोंढवा) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे. यापुर्वी पोलिसांनी शाहबाज शरीफ शेख (२५, कोंढवा खुर्द),  दलाल, शाहरुख जावेद दलाल (२६, गल्ली नं. ३ कोंढवा खुर्द) य़ा दोघांना अटक केली होती.

२ फेब्रुवारी रोजी रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून सलमान दलाल व इतरांची भांडणे झाली होती. या भांडणात सलमान उर्फ लड्डू याने त्याच्याजवळील पिस्तूलातून गोळी झाडली होती. त्यात  जय शंकर गुप्ता (वय 26, रा. सर्वे. 6, आजमेरा पार्क, कोंढवा खुर्द) याच्या पोटात गोळी लागून तो जखमी झाला होता. तर, सॅमसंग जॉनदास (वय 25, रा. कोंढवा) आणि नावेद रज्जाक शेख (वय 27, रा. मिठानगर) हे दोघे जखमी झाले होते. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी सलमान आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता. इतर दोघांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र सलमान हा पसार झाला होता. मात्र सोमवारी तो कॅम्प परिसरात येणार असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजस शेख यांना मिळाली होती. त्यानुसार कोंढवा पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलीस त्याच्याकडील पिस्तूलाचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, कर्मचारी राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, योगेश कुंभार, निलेश वणवे, उमाकांत स्वामी यांच्या पथकाने